पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तालुकास्तरीय बुद्धीबळ व कुस्ती स्पर्धेत इन्फंट कॉन्व्हेंटची झळाळती कामगिरी : १२ जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड.

इमेज
संपादक राहुल मसुरे माणिकगड न्युज नेटवर्क             राजुरा :-- इन्फंट जीजस सोसायटी संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये आपली दमदार छाप उमटवत विजयाची पताका फडकावली आहे. विशेषतः बुद्धीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक खेळी करत तब्बल १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.        यामध्ये १४ वर्षांखालील गटातून – आयुष येरणे, कु. रश्मी देशमुख, १७ वर्षांखालील गटातून – कार्तिक रामटेके, कु. प्रिन्सि बाराई, १९ वर्षांखालील गटातून – ओम चन्ने, आर्या येरणे, सोहम घट्टुवार, अर्णव पोडे, कु. ऋत्विका सुदामल्ला, लहेर लेखराजनी, श्रावणी उराडे यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. याशिवाय ग्रीको-रोमन ओपन स्टाईल कुस्तीमध्येही शाळेच्या खेळाडूंनी सुवर्णयश संपादन केले. ५५ किलो गटात – ओम काळे यांनी, ६० किलो गटात – कैफ खान यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेचे तिकिट मिळवले आहे.           उल्लेखनीय कामगिरी करून विद्य...

स्लाॅटर हाऊस कसाईखाना सुरू करण्याची परवानगी द्या**ऑल इंडिया जमीयतुल कुरैश संघटनेची मागणी

इमेज
*स्लाॅटर हाऊस कसाईखाना सुरू करण्याची परवानगी द्या* *ऑल इंडिया जमीयतुल कुरैश संघटनेची मागणी*   प्रतिनिधी  शब्बीर जागिरदार जिवती:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरेशी बांधवांनी आपला व्यवसाय बंद करून महाराष्ट्र राज्य बंद पुकारला आहे, गौरक्षकाच्या नावावर तथाकथित काही संघटना गाय बैल म्हैस व इतर जनावराचे धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून त्या व्यापाऱ्यांना मारहाण करणे त्यांच्याकडचं माल जप्त करणे असे कारवाया महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे त्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्यांनी, कुरेशी बांधवांनी महाराष्ट्र राज्यात बंद पुकारून निदर्शने, मोर्चे, सभा व निवेदनाच्या माध्यमातून मागण्या करत आहे. तहसीलदार जिवती, मुख्याधिकारी नगरपंचायत जिवती, यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आम्ही खालील व्यापारी आमच्या भागात पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या जनावरांच्या (महेस, रेडा ,शेळी,मेंढी) कत्तलीचे कार्य कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी स्थानिक संस्थेच्या अधिकार प्राप्त क्षेत्रात कायदेशीर स्लॉटर हाऊस सुरू करण्यासाठी परवानगी मागत आहोत. महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग यांचे ...

जिवती शहरात जागतिक मुळनिवासी गौरव दिन**भव्य रॅली व महोत्सव २०२५*

इमेज
*जिवती शहरात जागतिक मुळनिवासी गौरव दिन* *भव्य रॅली व महोत्सव २०२५* मुळनिवासी (आदिवासी) एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने दि. 09 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला  आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्याने भव्य रॅली व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ▪️कार्यक्रमाचे अध्यक्ष➖  भिमराव पाटील मडावी माजी सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर  ▪️कार्यक्रमाचे उद्घाटक➖   गजानन स्व. गोदरु पा.जुमनाके माजी नगराध्यक्ष तथा अध्यक्ष गुणवंत आदिवासी शिक्षण संस्था जिवती  ▪️प्रमुख मार्गदर्शक➖ सुधाकर कन्नाके, जिल्हाध्यक्ष गोंडीयन सामाजिक सहायता संस्था चंद्रपूर  ◾ भव्य रॅली (बाबुराव शेडमाके चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर- शिवाजी महाराज/संत सेवालाल महाराज- बिरसा मुंडा/श्यामादादा कोलाम चौक) ◾ गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार  ◾ गाव पाटलांचा मोरपंख पिवळा दुपट्टा ने सत्कार  ◾ समाज प्रबोधन कार्यक्रम  ◾ आदिवासी नृत्य सांस्कृतिक महोत्सव  ◾ आदिवासी समस्या बाबत तहसीलदारांना निवेदन  ◾ मोठ्या उत्साहाने समाज बां...