तालुकास्तरीय बुद्धीबळ व कुस्ती स्पर्धेत इन्फंट कॉन्व्हेंटची झळाळती कामगिरी : १२ जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड.
संपादक राहुल मसुरे माणिकगड न्युज नेटवर्क राजुरा :-- इन्फंट जीजस सोसायटी संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये आपली दमदार छाप उमटवत विजयाची पताका फडकावली आहे. विशेषतः बुद्धीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक खेळी करत तब्बल १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये १४ वर्षांखालील गटातून – आयुष येरणे, कु. रश्मी देशमुख, १७ वर्षांखालील गटातून – कार्तिक रामटेके, कु. प्रिन्सि बाराई, १९ वर्षांखालील गटातून – ओम चन्ने, आर्या येरणे, सोहम घट्टुवार, अर्णव पोडे, कु. ऋत्विका सुदामल्ला, लहेर लेखराजनी, श्रावणी उराडे यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. याशिवाय ग्रीको-रोमन ओपन स्टाईल कुस्तीमध्येही शाळेच्या खेळाडूंनी सुवर्णयश संपादन केले. ५५ किलो गटात – ओम काळे यांनी, ६० किलो गटात – कैफ खान यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेचे तिकिट मिळवले आहे. उल्लेखनीय कामगिरी करून विद्य...